धाराशिव (प्रतिनिधी)- अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उमरगा पोलीस ठाण्याचे पथकास गोपनीय माहिती मिळाली की, स्विफ्ट डिझायर गाडी क्र एमएच 14 जीडी 1337 यामधून अवैध गुटखा वाहुन नेला जात आहे. यावर पथकाने अचानक नाकाबंदी लावून तलमोड चेक पोस्ट येथे सापळा लाउन 12.35 वा. सु. नमूद स्विफ्ट गाडी थांबवली. यावेळी स्विफ्टमध्ये असलेल्या चालक शेख रेहान शेख रहिम, वय 31 वर्षे, रा. हुजरा मस्जिद जवळा,मोमीनपुरा ता. जि. बीड, व त्यांचा सहकारी सय्यद अफरोज सय्यद सलीम, वय 28 वर्षे, रा. मोहम्मादिया कॉलनी, मोमीनपुरा ता. जि. बीड यांच्याकडे पोलीसांनी स्वु्िटमधील माला विषयी विचारपुस केली. एकंदरीत त्या स्विफ्टमधून एकुण हिरा पान मसाला 1890 पुडे, रॉयल 717 सुगंधीत तंबाखु 1575 पुडे वाहनासह असा एकुण 2 लाख 74 हजार 50 रूपये किंमतीचा महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ वाहतूक होत असल्याचे आढळले. यावर पथकाने नमूद गुटखा व वाहतुकीस वापरलेली स्विफ्ट असा एकुण 5 लाख 74 हजार 50 रूपयांचा माल जप्त करुन शेख रेहान शेख रहिम, सय्यद अफरोज सय्यद सलीम, या दोघांविरुध्द उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आहे.
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमरगा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुर्यवंशी, पोलीस ठाणे उमरगा यांच्या पथकाने केली आहे.