धाराशिव (प्रतिनिधी)- गवळी गल्लीतील, स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेले, धाराशिवचा महाराजा व मानाचा गणपती म्हणून गणल्या गेलेल्या श्री बाल हनुमान गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन थीम,, एक उद्दिष्ट ,एक ध्येय घेऊन कार्य करीत आले आहे.  व्यसनमुक्त युवक व नशा मुक्त भारत, प्लास्टिक मुक्त भारत, प्रदूषण मुक्त भारत हे युवकांच्या चळवळीतूनच व सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण आहाराचा गणला जातो आहे आशा असे जनजागृती चे कार्य हे गणेश मंडळ करीत आले आहे समाजामध्ये ही जनजागृती म्हणजे देशाचे भवितव्य घडविणे आहे .नशा ,व्यसन ,गांजा , ड्रग्ज विविध प्रकारचे गुंगी आणणारे पेय अशा व्यसनाच्या युवक व युवती आहार्य जाऊ नये. देशास विनाशाकडे घेऊन जाणारे कार्य होते आहे .हे होऊ नये म्हणून मंडळ गेली 62 वर्षापासून समाज हित, विधायक कार्य ,जनप्रबोधन, जनजागृती व सामान्य माणसाचे जीवन उद्ध्वस्त होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे.अशी पत्रके वाटप करत असताना याची सुरुवात जिल्हाधिकारी व दंडाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या शुभहस्ते जिल्हाधिकारी कार्यालयापासून वाटपास सुरुवात करण्यात आली .यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या शुभहस्ते वाटप केले गेले. विधी कायदेविषयक मोफत सल्ला केंद्र यांनाही नशा मुक्त भारत अभियान सहभाग असावा. आपले सहकार्य मिळावे. पोम्प्लेट देण्यात आले आवाहन केले . पुजार यानी आपले गणेश मंडळ विविध प्रकारच्या उपक्रमामध्ये सामाजिक व विधायक कार्यामध्ये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मध्ये निधी देण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळ ,भूकंप ,निसर्गाचा कोप होतो त्यावेळेस मंडळांनी आपल्या सहकार्य मदत केलेली आहे . विविध उपक्रमाच्या माध्यमातून उत्सवाच्या काळात राष्ट्रभक्ती, सामाजिक ऐक्य, अधिक बळकट करण्याचा प्रयत्न मंडळ करीत आले आहे.नशा मुक्त युवा संकल्प अभियान हे एका मंडळाचे काम नसून हे सर्व जनसामान्य पासून तेअसामान्य माणसाचे आहे.  समाजामध्ये व्यसन, नशा यात तरुणाई अडकू नये गुंतू नये. युवक व्यसनाधीन झाला तर कुटुंब, समाज व देशाचे फार मोठे नुकसान होणार आहे, जनजागरण शुभेच्छा. 

जिल्हाधिकारी कार्यालयात नळदुर्ग नगर परिषदेचे सर्व सदस्य व दैनिक सामना पत्रकार सुधीर पोतदार, खारवे मारुती, फारूक कुरेशी ,मा. क्रीडा अधिकारी बनसोडे यांनीही अत्यंत आनंदाने या पोम्प्लेट वाटप सहभाग घेऊन हे कार्य आपल्या सर्वांचे आहे. असे मत व्यक्त केले.

विविध कार्यालयामध्ये, बस स्टॅन्ड, विविध चौकात जेथे गर्दीचे ठिकाण पॉम्पलेट वाटप करून व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन करण्यात येत आहे.

 यावेळी लहान मुलापासून ते प्रौढ माणसापर्यंत गवळी गल्लीतील शंभर मुला मुलींनी पॉम्पलेट हातामध्ये घेऊन आम्ही प्रत्येकी पाच घरामध्ये वाटप करणार असे आवाहन केले. यामुळे हा गणेशोत्सव हा राज्य महोत्सव म्हणून गणला जात असताना युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होण्यासाठी शासनाच्या प्रत्येकी नियमाचे पालन करणारे एकमेव गणेश मंडळ आहे. यावेळी मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. शिवछत्रपती पुरस्कारते मा. विभागीय वाहतूक अधिकारी राजकुमार दिवटे मूर्तिकार काशिनाथ दिवटे व संजय पाळणे मा. प्राचार्य भालचंद्र हुच्चे, प्रा गजानन गवळी यांनी जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांचे स्वामी विवेकानंदांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत केले.


 
Top