धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये 79 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला.
प्रथम प्रशालेचे प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज गीत, महाराष्ट्र गीत व मराठवाडा मुक्ती संग्राम गीत संगीत शिक्षक महेश पाटील व त्यांच्या चमूने सादर केले.त्यानंतर एन .सी.सी प्रमुख ए .व्ही .शेंडगे व स्काऊट गाईड प्रमुख व्ही .एम शेवाळे यांच्या संघाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली .
त्यानंतर सेवानिवृत्त उपमुख्याध्यापक यशवंत इंगळे यांचा सत्कारसंस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष सुधीर पाटील यांनी केला त्याचबरोबर राज्य गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करणाऱ्या स्कॉलरशिपधारक विदयार्थिनी कु. आरोही अनिल अर्जुने, कु .श्रेया शरद क्षीरसागर, कु .अन्वी अमित राजे निंबाळकर तसेच दहावी व बारावी बोर्ड परीक्षा व इतर परीक्षेतील गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य नंदकुमार नन्नवरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास उलगडून दाखवताना धाराशिव जिल्हयातील स्वातंत्र्यसेनानीचा लढा अधोरेखित केला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील, संस्था सदस्य पी.एल. गाडे, के., संतोष कुलकर्णी,मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपप्राचार्य संतोष घार्गे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम ,पर्यवेक्षक कुमार निकम, शेषनाथ वाघ, राजेंद्र जाधव,के. के. पाटील, बालाजी गोरे ,श्रीमती बी .बी. गुंड, मोहन शिंदे, के. के. कोरके क्रीडा शिक्षक अभिजित पाटील व लक्ष्मण सांळुखे व सेवानिवृत्त शिक्षक विक्रम सांडसे, अरुण बोबडे, शिवाजी धोंगडे, घोरपडे सर,घाटगे सर आणि वाणेगावचे प्रतिष्ठित नागरिक पाटील साहेब तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते गुरूवर्य के .टी . पाटील सरांच्या पुतळ्यास पुष्पहार घालण्यात आला.
शेवटी कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य संतोष घार्गे यांनी मानले तर ' वंदे मातरम ' या गीताने कार्यक्रमाचे सांगता झाली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूर्यकांत पाटील , दीपक केंगार , कमलाकर पाटील , संदीप जगताप व श्रीमती जयमाला शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख कुमार निकम यांनी केले तर या कार्यक्रमासाठी नाईक सुहास ताटे व त्यांच्या टीममधील सदस्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे चित्रीकरण शिवाजी भोसले ,सूरज सपाटे यांनी केले.
