साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनचा १०० टक्के निकाल; विद्यार्थ्यांची परदेशात व नामांकित कंपनीत निवड
*कळंब प्रतिनिधी :*
 कळंब तालुक्यातील रांजणी येथील साई कॉलेज ऑफ कॉम्प्युटर एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा अंतर्गत मार्च-एप्रिल २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत घवघवीत यश मिळविले असून महाविद्यालयाचा सरासरी १०० टक्के निकाल लागला आहे.
शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच रोजगार क्षेत्रातही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

बीसीएस तृतीय वर्षाच्या परीक्षेत कु. अर्पिता राजाभाऊ बिडवे हिने ९०.३ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला.कु. ऋतुजा राजाभाऊ पुरेकर हिने ८८.९ टक्के* गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. तर कु. अल्फिया पठाण, कु. अश्विनी लोखंडे आणि कु. तनुजा यादव यांनी प्रत्येकी८८.२ टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांकाचा मान मिळविला.

बीसीए तृतीय वर्षाच्या परीक्षेत कु. सुजाता दिनकर भिसे हिने ८४.९० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. गोविंद हनुमंत ढवणेयाने ७८.९० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला, तर कु. सानिका पांडुरंग बावळे हिने ७८.५० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला.

महाविद्यालयाच्या यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी दयानंद जटाळ याची युरोप खंडातील जॉर्जिया या देशात सॉफ्टवेअर डेव्हलपर पदावर निवड झाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही अभिमानास्पद बाब मानली जात आहे.

तसेच बीसीएस तृतीय वर्षातील कु. अर्पिता बिडवे व स्वप्नील खोत या विद्यार्थ्यांची प्लेसमेंट ड्राइव्हद्वारे क्यू स्पायडर या नामांकित प्रशिक्षण व रोजगार देणाऱ्या संस्थेत निवड झाली आहे. त्यामुळे महाविद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच रोजगाराभिमुख प्रशिक्षणालाही यश मिळाल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न बी. बी. ठोंबरे, सचिव ए. बी. ठोंबरे, उपाध्यक्ष डी. आर. काळदाते, समन्वयक बी. के. भातलवंडे,कृषिभूषण पी. एस. आवाड, डॉ. ए. बी. जगताप*, . प्र.प्राचार्य जे. सी. गवळी तसेच प्रा. एन. एम. चाऊस, प्रा. एम. के. साबळे, प्रा. ए. डी. जाधव, प्रा. गायकवाड रवि,पी. जी. मोरे, प्रा. आर. आर. देशमुख, एस. एच. शेख,बी. डी. लांडगे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
 
Top