डॉक्टर निलंबित, उपचारात हलगर्जीपणा – बाळ दगावले,  धाराशिव स्त्री रुग्णालयातील प्रकार


प्रतिनिधी  / धाराशिव 

धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अंतर्गत असलेल्या स्त्री रुग्णालयात हलगर्जीपणामुळे बाळ दगावल्याची घटना घडल्यानंतर एका डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. वैद्यकीय अधीष्ठाता डॉ शैलेंद्र चौहान यांनी स्त्री रोग तज्ज्ञ डॉ तृप्ती राडकर यांच्यासह चतुर्थ श्रेणी कर्मचारी सौरभ जाधव याला निलंबीत केले आहे. डिन शैलेंद्र चव्हाण यांनी सांगितले की प्रथम दर्शनी डॉक्टर राडकर यांची चूक दिसून येत आहे चौकशी समितीचा अहवाल 24 तासाच्या आत देण्यास सांगितले आहे त्यामुळे रात्री उशिरापर्यंत येईल असे डॉक्टर चव्हाण यांनी पु वि लोकराज्याशी बोलताना सांगितले

स्त्री रुग्णालयात तुळजापूर येथील कवीता प्रवीण जगताप ह्या प्रसूतीसाठी दाखल झाल्या होत्या. 5 जून रोजी महिलेची प्रसूती झाली मात्र प्रसुती दरम्यान बाळाचा मृत्यू झाला. 8 जून रोजी कविता जगताप यांच्या नातेवाईकांनी याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. नातेवाईकांच्या आरोपानुसार प्रसूती दरम्यान डॉक्टरांकडे वारंवार सिझर करण्याची मागणी केली होती. मात्र वेळेत सिझर केले नाही. प्रसुतीदरम्यान महिला डॉक्टरासोबतच्या एका पुरुष कर्मचाऱ्याने मातेचे पोट जोरात दाबल्याने बाळाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामुळे येथील रुग्णालयात तज्ञ डॉक्टर मुळे चांगले उपचार मिळतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे
 
Top