तुळजापूर (प्रतिनिधी)- जिल्हयात नगरपरिषद  व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महा-विकासआघाडी सोबत जाण्यास एमआयएम तयार, परंतु आघाडीकडून सन्मानाची वागणूक न मिळाली तर पक्ष स्वबळावरही लढण्यास सज्ज असल्याचे मत जिल्हा अध्यक्षा सिद्धीक उ़र्फ गोलाभाई शेख यांनी व्यक्त केले.

तुळजापूरमध्ये पत्रकारांशी संवादात गोलाभाई शेख म्हणाले, “भाजपला सत्ता पासून रोखण्याकरिता आम्ही महाविकासआघाडी सोबत जाण्यास इच्छुक आहोत. परंतु, आमच्या पक्षाला योग्य स्थान व सन्मान मिळाला नाही तर  आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची तयारीत आहोत.” गोलाभाई शेख  पुढे म्हणाले कि “जिल्ह्यात आमच्या पक्षाकडे सर्वजाती, सर्वधर्मीय उमेदवारांची  मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.”“नळदुर्ग, तुळजापूर या परिसंस्थांमध्ये महाविकासआघाडी सोबत राहण्याचे आमचे मन आहे; पण सन्मानाच्या बाबतीत जर समंजसपणा झाला नाही तर आम्ही स्वबळावर उतरण्यास तयार आहोत“एमआयएममध्ये येण्यासाठी  अनेक मोठे नेते येण्यास इछुक असल्याचे यावेळी स्पष्ट केले.  एमआयएम ची तालुक्यात नळदुर्ग येथे राजकिय ताकद आहे तसेच तुळजापूर तालुक्याचा निकालात ही एमआयएम ची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

 
Top