तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषद चे बिगुल वाजला असून सध्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भावी नगरसेवकांची लगबग सुरु झाली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक तुळजापूर खुर्द मधील उमेदवारीकडे सगळयांच लक्ष लागलेलं असून सत्ताधारी भाजपा मधून इच्छुक असलेल्या कोणत्या भावी नगरसेवकाला पक्षकडून संधी मिळेल हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 

या प्रभागाची भौगोलिक रचना ही सारा गौरव, गवते प्लॉटिंग, तुळजाई नगर, समर्थ नगर तुळजापूर खुर्द व शिवरत्न नगर व लातूर रोड कडील काही भाग असा असून एकूण मतदार संख्या ही 2188 यात पुरुष मतदार 1105 तर महिला मतदार 108: या निवडणुकीत आपल्या मतांचा हक्क बजावणार आहेत. यासाठी तुळजापूर खुर्द मधील नगर पालिकेच्या शाळा क्रं 3 मध्ये स्वतंत्र 3 बूथ ची व्यवस्था निवडणूक विभागा मार्फत करण्यात आली आहे यामुळे सारा गौरव, गवते प्लॉटिंग समर्थ नगर या हद्दवाढ भागातील मतदारांची गैरसोय होणार असून मतदानाच्या टक्केवारी वर याचा परिणाम होणार आहे या मतदारांना मतदान केंद्र समर्थ नगर येथील पालिकेच्या अंगणवाडी येथे सोयीचे ठरले असते या भागापासून  सध्याचे मतदान केंद्राचे अंतर हे जवळपास अर्धा ते एक किलोमीटर लांब आहे हद्दवाढ भागात मागील काळात कसल्याही प्रकारची विकास कामे केली गेली नसल्याने या भागातील मतदारांची तीव्र नाराजी विद्यमान नगरसेवका वर असल्यामुळे जाणून बुजून या पुढऱ्यांनी प्रशासनाला हाताशी धरून मतदान केंद्र हे मतदारांच्या गैरसोयीचं करून ठेवल्याची चर्चा या मतदार संघात सुरु आहे यंदा इच्छुक असणारे नारायण नन्नवरे यांचा 2011 सालच्या निवडणुकीत एनवेळी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शेकाप पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवून याच पंडीत जगदाळे यांनी त्यांचा पत्ता कट करून नगरसेवक पद पटकावले होते याची मनात कोणतेही सल मनात न ठेवता व यावेळेस ही पक्षाने संधी न दिल्याने नाराज न होता नारायण नन्नवरे यांनी पक्षाचा आदेश मानून पंडीत जगदाळे व मंजुषा देशमाने यांच्या विजयात महत्वाची भूमिका निभावली होती या प्रभागातील आरक्षण हे अ- सर्वसाधारण स्त्री व ब - सर्वसाधारण असे असून यामध्ये भाजपा कडून नारायण नन्नवरे, पंडीत जगदाळे, प्रसाद पानपुडे व मंजुषा देशमाने,ऍड अंजली साबळे हे इच्छुक असून    पक्षातील त्यांचे जुने सहकारी नारायण नन्नवरे हे उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठी कडे जोर लावत आहेत तर त्यांना मानणारे कार्यकर्ते, मतदार हे त्यांनी कोणत्याही परिस्थिती मध्ये अपक्ष किंवा इतर कोणत्याही पक्षा कडून ही निवडणूक लढवावी यासाठी आग्रह धरत आहे तसेच महाविकास आघाडी ही नारायण नन्नवरे यांना गळाला लावण्यासाठी प्रयत्नशिल आहे. अशा परिस्थिती मध्ये भाजपा पक्षश्रेष्ठी प्रभाग क्रमांक एक मध्ये भाकरी फिरवते की असलेली भाकरी करपवते हे पाहण्याचे आत्सुक्याचे ठरेल.


 
Top