धाराशिव (प्रतिनिधी)- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज 7 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात नागरिकांची निवेदने स्वीकारली व प्राप्त निवेदनातून नागरिकांशी संवाद साधला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील,जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना,अपर जिल्हाधिकारी श्रीमती ज्योती पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शोभा जाधव,उपजिल्हाधिकारी शिरीष यादव,संतोष राऊत,अरुणा गायकवाड,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,संजय पाटील यांच्यासह सर्व तहसीलदार तसेच भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले की,आजच्या या कार्यक्रमातून नागरिकांची जी निवेदने प्राप्त झाली आहे,त्या सर्व निवेदनावर कार्यवाही करण्यात येईल.विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले 48 तासाच्या आत देण्यात यावीत.गायरान जमिनीच्या तसेच पवन ऊर्जा कंपन्यांच्या प्रश्नांबाबत लवकर बैठक लावण्यात येईल.असे श्री.बावनकुळे यांनी यावेळी सांगितले. यावेळी महसूल,भूमी अभिलेख, खनिकर्म तसेच विविध विभागाशी संबंधीत 350 पेक्षा जास्त निवेदने प्राप्त झाली.