तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील राजकीय वातावरणात नवचैतन्य निर्माण करत शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या तीन नव्या शाखांचे उद्घाटन मोठ्या जल्लोषात पार पडले. मौजे सिंदफळ, कामठा व अपसिंगा या गावांमध्ये एकाच दिवशी पक्ष शाखांची स्थापना करण्यात आली. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.

हे उद्घाटन शिवसेनेचे पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पक्ष सचिव संजय मोरे यांच्या आदेशानुसार तसेच पक्ष उपनेते ज्ञानराज चौगुले, सहसंपर्कप्रमुख भगवान देवकते, धाराशिव जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तर तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ढोल-ताशा, हलगी, आणि फटाक्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या सहभागाने वातावरण भारले होते. उद्घाटन सोहळ्याला तालुकाध्यक्ष अमोल जाधव व जिल्हाध्यक्ष मोहन पनुरे यांच्या शुभहस्ते प्रत्यक्ष शाखा सुरू करण्यात आल्या.

तालुकाध्यक्ष अमोल जाधव यांनी या वेळी बोलताना सांगितले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण तालुक्यात शाखा स्थापन करून जनतेपर्यंत पक्षाचे धोरण व कार्य पोहोचवले जाणार आहे.“ त्यांनी आतापर्यंत शेकडो कार्यकर्त्यांना शिवसेनेत प्रवेश करून सभासदत्व दिले आहे. सिंदफळ, कामठा आणि अपसिंगा येथे शाखा सुरू केल्यामुळे तालुक्यातील इतर राजकीय पक्षांमध्ये खळबळ माजली असून, शिवसेनेच्या संघटनशक्तीमुळे एक दबावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती युवा जिल्हाध्यक्ष गणेश जगताप,मीनाताई सोमाजी,रुपालीताई घाडगे,रेणूका शिंदे,राधा घोगरे,शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष गणेश नेपते,सोमनाथ घुट्टे,तुळजापूर शहर अध्यक्ष बापूसाहेब भोसले,शहर उपाध्यक्ष रमेश चिवचिवे,नितीन मस्के,शहाजी हाके,नागेश भोसले,स्वप्निल सुरवसे,संभाजी नेपते,भुजंग मुकेरकर,संजय लोंढे,मोहन भोसले,सिंदफळ शाखाचे शाखाप्रमुख राहुल शिंदे,उपशाखाप्रमुख मनोज व्यवहारे,सचिव सागर लांडगे,कोषाध्यक्ष अक्षय धनके,कामठा शाखाचे शाखाप्रमुख सुधीर जमदाडे,उपशाखाप्रमुख सुधाकर माळी,सचिव लखन जमदाडे,कोषाध्यक्ष शरद रोकडे,अपसिंगा शाखाचे शाखाप्रमुख सुरेश सुरडकर,उपशाखाप्रमुख रविंद्र वडगावकर,सचिव अभिजीत तोडकरी उपस्थित होते.


 
Top