तुळजापूर (प्रतिनिधी)- तु मोबाईल स्टेटस का ठेवला म्हणून शिवीगाळ करुन घराबाहेर बोलवुन, कारमधुन बसवुन सुरतगाव रोडवरील तळ्याजवळ नेवुन तिघाजणांनी बेदम मारहाण केल्याची 5 जुलै 2025 रोजी राञी दहा वाजता घडली.
या प्रकरणी एक पथक आरोपीचा शोधात आहे. वाहनताब्यात घेतले असुन आरोपींचे सीडीआर काढण्यात येत आहेत. आरोपींचा नातेवाईकाकडुन चौकशी केली जात असुन लवकरच आरोप ताब्यात घेतली जातील असा विश्वास तपास अधिकारी अनिल धनुरे यांनी व्यक्त केला.
या बाबतीत अधिक माहीती अशीकी, तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव पिपळा रोडला फिर्यादी योगेश हरि काळे वय 30 वर्ष व्यवसाय ट्रकचालक रा. सांगवी मार्डी ता. तुळजापुर जि. धाराशिव यांनी फिर्यादीत म्हटले आहे की मी लाईन वरिल ट्रक ड्रायव्हर म्हणुन काम करतो. रोहीत बागल रा. सांगवी मार्डी हा माझा मित्र असुन आम्ही पुर्वी गड संवर्धन मोहीमेवर जात होतो. रोहीत याचे मित्र चेतन माने, सत्यवान चादरे, हे पण माझ्या ओळखीचे आहेत. रोहीत बागल व माझे घरगुती संबाध होते. तो नेहमी आमचे घरी येत होता. मी गाडीवर गेल्यानंतर घरी कमी जास्त बघत होता. मी दोन वर्षांपुर्वी गड संवर्धन मोहीमेस असताना पुणे येथे शानवी पोटे रा. डोंबीवली मुंबई हीची ओळख झाली होती. आमचे एकमेकावर प्रेम असल्याने आमचा साखरपुडा झाला होता. ती माझे सोबतच राहत होती. चार महीन्यापुर्वी शानवी ही निघुन गेली होती. एक महीन्यापुर्वी शानवी पोटे व रोहीत बागल यांनी लग्न केल्याचे मला समजले. नंतर मी शानवी हीस फोन केला होता. त्यावेळी रोहीत बागल याने मला मारहाण केली होती. शानवीने मला धोका दिल्याने मी मोबाईलवर स्टेटस ठेवले होते.
दि. 05/07/2025 रोजी रात्री 10.00 वा. मी घरी झोपलो असताना रोहीत बागल व त्याचा मित्र चेतन माने रा. काक्रंबा ता. तुळजापुर, सत्यावान चादरे रा. तुळजापुर हे माझे घरी आले व रोहीत बागल याने मला तु मोबाईलवर स्टेटस का ठेवले म्हणुन शिवीगाळ केली व तु बाहेर चल म्हणुन मला बाहेर बोलावुन त्यांनी आणलेली इर्टीका कार क्र. एमएच25 एजे 7988 मधे मला बसवुन नॅशनल हायवे 65 रोडने सुरतगावचे पुढे तळ्यजवळ रोडकडेला नेहुन तेथे रोहीत,
बागल याने वायरने चेतन माने याने बेल्टने व सत्यवान चादरे याने काठीने माझे पाठीवर छातीवर तोंडावर मारले. त्यामुळे माझे सर्व आंगावर काळे निळे वळ उमटले असुन दोन्ही डोळ्यांना मार लागगुन काळेनिळे झाले आहे. मला तेथेच सोडुन त्यांनी इथुन पुढे तु शानवीचे नाव घेतला तर तुला जिवे मारुन टाकीन असे म्हणुन धमकी दिली आहे.
मला मारहाण झाल्याचे समजल्यानंतर कृष्णा संभाजी खंडेराव, अनिल पवार, रोहन शिंदे सर्व रा. सांगवी मार्डी ता. तुळजापुर यांनी मला आणुन औषधोपचाराकामी सरकारी दवाखाना तुळजापुर येथे दाखल केले व तेथुन सरकारी दवाखाना धाराशिव येथे रेफर केले आहे. या प्रकरणी तीन जणांविरोधात तुळजापूर पोलिस स्टेशन येथे 140(3)118(1)352,351(2)3(5) अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक अनिल धतुरे हे करीत आहेत.