तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील खंडाळा गावाजवळील खडी केंद्राच्या बॉयलरमधून कार्बन डायऑक्साइड आणि इतर हानिकारक वायूंचा उत्सर्जन होत असल्याने गावकऱ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. या बॉयलरची चिमणी फक्त दोनशे  मीटर अंतरावर असून, त्याची उंची कमी असल्यामुळे प्रदूषित वायू थेट गावात पसरत आहेत. यामुळे गावातील नागरिकांना श्वसनाच्या समस्या, डोकेदुखी, दम लागणे अशा तक्रारी वाढल्या आहेत.

गावातील रहिवासी यांनी  या प्रकरणी ग्रामपंचायत  स्थानिक प्रशासनाकडे तक्रार दाखल केली असून, खडी केंद्राच्या बॉयलरच्या चिमणीची उंची वाढवण्याची तातडीची मागणी केली आहे. यामुळे आमच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. लहान मुले, वृद्ध आणि आजारी लोकांना विशेष त्रास होत आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून चिमणीची उंची वाढवावी,“ अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

 
Top