धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र योगासन स्पोर्ट्स असोसिएशनच्या अधिपत्याखाली धाराशिव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने रविवार 20 जुलै रोजी धाराशिव येथे जिल्हास्तर योगासन स्पर्धा व राज्यस्तर स्पर्धा निवड चाचणी चे आयोजन करण्यात आले आहे.
धाराशिव येथील तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित या स्पर्धेस सकाळी 9.00 वाजता प्रारंभ होणार आहे. या स्पर्धा ट्रॅडिशनल योगासन, आर्टिस्टिक योगासन सिंगल, आर्टिस्टिक योगासन पेअर, रिदमिक योगासन पेअर, फॉरवर्ड बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट, बॅक बेंड इंडिव्हिज्युअल इव्हेंट, हॅन्ड बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट, लेग बॅलेन्स इंडिव्हिज्युअल इव्हेंट, ट्विस्टिंग बॉडी इंडिव्हिज्युअल इव्हेंट, सुपाइन इंडिव्हिज्युअल आदी प्रकारात 10 ते 14, 14 ते 18, 18 ते 28, 28 ते 35, 35 ते 45, 45 ते 55 वर्षे मुले, मुली, महिला व पुरुष यांच्या वयोगटात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेतून राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी जिल्ह्यातील योगपटूंची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी होणारा खेळाडूंनी आधार कार्डची झेरॉक्स, वयाचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र), डॉक्टर फिटनेस प्रमाणपत्र, पासपोर्ट साइज फोटो, जोखीम प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य असून स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रवीण गडदे, अभय वाघोलीकर, राजेश बिलकुले, योगेश थोरबोले, रोहित सुरवसे, प्रतापसिंह राठोड, प्रणाली जगदाळे, वंदना इंगळे, इंदुमती जाधव, सीमा चौरे, विनिता जाधव आदींशी संपर्क साधून स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा योगासन संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.