धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या स्वस्त धान्य दुकानांमधून रेशन घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांसाठी शिधापत्रिकेचे ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली असली, तरीही जिल्ह्यात अद्याप सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेले नाही.

जिल्ह्यातील एकूण 11 लाख 91 हजार 996 लाभार्थ्यांपैकी 8 लाख 90 हजार 407 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली असून 3 लाख 1 हजार 589 लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप अपूर्ण आहे. राज्य शासनाने या प्रक्रियेची अंतिम मुदत 31 जुलै 2025 अशी निश्चित केली आहे.या तारखेनंतरदेखील जे लाभार्थी ई-केवायसी करणार नाहीत, त्यांची नावे बोगस लाभार्थी समजून सप्टेंबर 2025 पासून त्यांना धान्याचा लाभ देण्यात येणार नाही,असे स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत.

ई-केवायसी करताना अंगठ्याचा ठसा नोंदवताना अडचण आल्यास आय स्कॅनरचा वापर करून प्रक्रिया पूर्ण करता येईल.तसेच कामानिमित्त बाहेरगावी असलेल्या लाभार्थ्यांनी 'मेरा ई-केवायसी' हे मोबाईल ॲप डाऊनलोड करून त्याद्वारे ई-केवायसी 31 जुलै 2025 पर्यंत पूर्ण करावी,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 
Top