तुळजापूर (प्रतिनिधी)-  पोर्णिमा सलग आलेल्या व सुट्यांच्या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ सोमवार दि. 12 मे रोजी पोर्णिमे निमित्ताने भाविकांची  मोठी गर्दी झाली होती. 

चैत्र महिना संपल्यानंतर चालू झालेला वैशाख महिना, उन्हाळी सुट्टी आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. वाढते तापमान, ढगाळ वातावरण पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत होता. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर उष्णतेचा त्रास होवू नये म्हणून पहाटे 1 वाजता चरणतीर्थ होवून धर्मदर्शनास प्रारंभ झाल्या. नंतर दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सकाळनंतर भाविकांचा ओघ वाढल्याने अभिषेक, धर्म, मुख, सशुल्क दर्शनरांगा भाविकांनी भरून गेल्या होत्या. पोर्णिमा पार्श्वभूमीवर खेटेकरी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. राञी मंदीर प्रांगणात पोर्णिमे निमित्ताने छबिना काढण्यात आला. महंत वाकोजी बुवा यांनी जोगवा मागितल्यानंतर पोर्णिमेचा धार्मिक विधीचा सांगता झाली.

 
Top