उस्मानाबाद/ प्रतिनिधी

फसवणूक, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून पुढील तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. यामध्ये शिराढोण पोलिस ठाण्यातील फसवणुकीच्या गुन्ह्यातील मोहा (ता.कळंब) येथील पारधी पेढीवरील आरोपी हिरा विश्वनाथ काळे (४२) पोलिसांना हवा होता. गावी आल्याची खबर शिराढोण पोलिसांना प्राप्त झाल्याने पथकाने त्यास सोमवारी (दि.४) राहत्या घरातून ताब्यात घेतले. तसेच बेंबळी पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील ढोकी येथील आरोपी दिलीप बब्रू पवार याचा १ वर्षापासून पोलिस शोध घेत होते. त्यास बेंबळी परिसरातून तर वाशी पोलिस ठाण्यातील खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यातील पिंपळगाव (ता. वाशी) येथील आरोपी सविता शंकर शिंदे यांना तर परंडा ठाण्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी रेणूका सुनील काळे यांना परंडा येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी ताब्यात घेतले अाहे.


 
Top