उस्मानाबाद / प्रतिनिधी-
सावकारकीच्या प्रकरणात जमिनी लिहून घेणाऱ्या महिला सावकाराविरोधात उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथील शालीनी फत्तेपुरे या महिलेने महादू लोहार यांना सावकारी कर्ज देऊन त्यांची १.२० हेक्टर शेतजमीन स्वत: खरेदी केली. हा प्रकार सावकारीतून झाल्याबाबतची तक्रार महादू लोहार यांनी सहकार अधिकारी, श्रेणी-२ सहायक निबंधक सहकारी संस्था, उमरगा यांच्याकडे केली होती. या प्रकरणाच्या चौकशीत अवैध सावकारी झाल्याचा प्राथमिक पुरावा दिसत असल्याचा अहवाल अधिकाऱ्याने दिला होता. त्यानंतर सहकार अधिकारी अजित जाधव यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कलम-३९ अंतर्गत बुधवारी गुन्हा नोंदवला आहे.
