उस्मानाबाद/ प्रतिनिधी
जिल्हाभरातील १८ पोलिस ठाण्यांतर्गत बुधवारी एकाच दिवशी तब्बल ३९ ठीकाणांवर छापे मारून अवैध दारूविक्री करणाऱ्या ३९ जणांवर गुन्हे नोंद करण्यात आले. पोलिस अधीक्षक राज तिलक रोशन यांच्या आदेशावरून ही विशेष मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील उमरगा, उस्मानाबाद शहर, ढोकी, परंडा, भूम, अंबी, शिराढोण, नळदुर्ग, मुरूम, तामलवाडी, कळंब, लोहारा अशा जवळपास सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत ही विशेष मोहिम राबविण्यात आली. यादरम्यान ३९ कारवाया करण्यात आल्या.
या छाप्यात आढळलेला गावठी दारूनिर्मितीचे १६०० लिटर रसायन जागीच ओतून नष्ट करण्यात आले. तर ३५६ लिटर गावठी दारू, देशी- विदेशी दारूच्या ३७७ बाटल्या जप्त करण्यात आल्या. ओतून दिलेला मद्यार्क निर्मितीचा द्रवपदार्थ व जप्त दारु यांची एकत्रित किंमत ९८ हजार ६१६ इतकी आहे. या सर्वांविरोधात संबधित पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी अशा कारवाया नेहमी कराव्यात अशी ग्रामस्थंाची अपेक्षा आहे.
