श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी व जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन व तालुका क्रीडा संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत राज्य राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट खेळाडू घडविणारे संजय बदोले यांची महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी तर शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे विक्रम पाटील यांची मराठवाडा प्राथमिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल व इसाक पटेल यांना आविष्कार फाउंडेशन चा क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री तुळजाभवानी क्रीडा संकुल उस्मानाबाद येथे सोमवार दिनांक ४ रोजी श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी, जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन व तालुका क्रीडा संयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात संजय बदोले, विक्रम पाटील व इसाक पटेल यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री भरत जगताप हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले , महाराष्ट्र राज्य सायकलिंग असोसिएशनचे सहसचिव अभय वाघोलीकर ,जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिभीषण पाटील, अर्जुन पुरस्कार प्राप्त तथा तालुका क्रीडा अधिकारी सारिका काळे ,या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव मोहन पाटील , जिल्हा हँडबॉल संघटनेचे सचिव कुलदीप सावंत , जिल्हा आर्चरी संघटनेचे सचिव प्रवीण गडदे , जिल्हा टेनिक्वाईट संघटनेचे सचिव रामकृष्ण खडके , जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव जावेद शेख , जिल्हा साॅफ्टबाॅल संघटनेचे सचिव राजेश बिलगुले , सामाजिक कार्यकर्ते मौलाना सर ,उस्मानाबाद जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सहसचिव योगेश थोरबोले, जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेचे सदस्य संजय कोथळीकर , विशाल सरतापे , रामजी सोळंकी,प्रभाकर जाधव व अॅथलेटिक्स व फुटबॉलचे खेळाडू उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल सरतापे व आभार श्री तुळजाभवानी क्रीडा प्रबोधिनी चे सचिव कुलदीप सावंत यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अजिंक्य वराळे ज्ञानेश्वर भुतेकर, राम भुतेकर, ऋषिकेश पाटील, दिनेश माने,विशाल बोरकर, ऋषिकेश हाजगुडे,सुरज ढेरे शाजर शेख,व्यकटेश दंडे आदींची उपस्थिती होती.
