कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ आई -वडीलांचे संस्कार व अथक परिश्रम घेण्याची तयारी, गावासाठी कांहीतरी करण्याची तळमळ लोकांच्या कामासाठी केलेला संघर्ष यातुनच अॅड. व्यंकटराव गुंड यांचे अष्टपैलू नेतृत्व तयार झाले. जे भुतकाळ विसरत नाहती तेच इतिहास घडवितात, असे गौरव उद्गार संत साहित्याचे अभ्यासक अॅड. पांडूरंग लोमटे यंानी काढले.
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य तथा रूपामाता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष अॅड.व्यंकटराव गुंड यांचा वाढदिवस यावर्षी मौजे.पाडोळी (आ) येथे दि.०५ जानेवारी रोजी विविध सामाजिक उपक्रमांनी मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानंतर रात्री उस्मानाबाद येथे हॉटेल समर्थच्या हॉलमध्ये विविध संस्था व मित्र परिवाराच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी अॅड. लोमटे बोलत होते. भाजपाचे भास्कर बोंदर, शिवसेनेचे गोविंद कोळगे आदी उपस्थित होते. प्रारंभी वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात ५९ तरुणांनी रक्तदान केले. तसेच ८१ पाडोळी (आ) परिसरातील निराधार व्यक्तीना कपडे वाटप करण्यात आले.
दरम्यान अॅड.व्यंकटराव गुंड यांचा शाल, श्रीफळ व केक कापून भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी रूपामात नॅचरल शुगर पाडोळी (आ), येथे कारखान्याचे व्हाईस चेअरमन एम.के.सुर्यवंशी, जि.प.मा.उपाध्यक्ष श्री.सुधाकर गुंड गरूजी, एम.डी.अॅड.अजितकुमार गुंड , कार्यकारी संचालक श्री.गरड, चिफ इंजिनीअर खोचरे , चिफ केमिस्ट निरफळ, सुरक्षा अधिकारी मसे तसेच कारखान्यातील कर्मचारी व रूपामाता डेअरीचे जनरल मॅनेजर माने, श्री सावळकर आणि रूपामाता डेअरीचे सर्व कर्मचारी व पाडोळी (आ) ग्रामस्थ व अंबीका स्टोन क्रशरचे मालक संदिप एकंडे, कन्हैया पेट्रोलपंपाचे मालक तावडे तसेच पाडोळीकर दुध डेअरीचे प्रदीप गंड , जेष्ठ उदयोजक संजय पटवारी, मारुतीराव सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ जोशी , सरव्यवस्थापक बोधले , उप-सरव्यवस्थापक मिलीद खांडेकर , श्री. घेवारे, तसेच मॅनेजर खोत , मुख्याध्यापक सुर्यवंशी सर, अमोल गुंड सर, इर्लेकर सर, सुर्यवंशी सर, मुख्याध्यापक मनसुळे सर, शेख सर, यादव सर, गावीत तसेच अॅड.पांडुरंग महाराज लोमटे,पत्रकार राजाभाऊ वैदय, भिमाशंकर वाघमारे, चेतन धनुरे, शिवसेना नेते दादा कोळगे, शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने , रणसुभे , विविध कार्यालयीन कर्मचारी व पाडोळी (आ) सोसायटीचे चेअरमन भरत दाजी गुंड, पोलिस पाटील धनंजय गुंड, नानासाहेब अंबुरे, मनोज गुंड, अॅड.शरद गुंड, आयडीबीआय बँकेचे तुळजापूर व उस्मानाबादचे मॅनेजर, इकविटास बँकेचे मॅनेजर तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक कार्यक्रमाला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचाल मनसुळे सर यांनी तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी मल्हारी माने यांनी मानले.