तेर  / प्रतिनिधी-

 घरबांधकाम करतेवेळी आणलेल्या सामानाचे पैसे न देता आल्यामुळे उस्मानाबाद तालुक्यातील पानवाडी येथील एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उस्मानाबाद तालुक्यातील म्होतरवाडी शिवारात उघडकीस आली. 

उस्मानाबाद तालुक्यातील पानवाडी येथील विनायक लक्ष्मण डक (४० वर्षे ) यांने घरबांधकाम करतेवेळी आणलेले सामानाचे पैसे देणे बाकी आहेत. बांधकामास जास्त खर्च झाल्यामुळे ते कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत सतत नाराज राहुन व कंटाळून विनायक यांनी म्होतरवाडी शिवारातील बांधावरील झाडास फांदीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी लक्ष्मण डक यांच्या माहितीवरून ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

 
Top