तुळजापूर / प्रतिनिधी- 

 तुळजापूर विकास प्राधिकरणाचा मंगळवार दि. ५ रोजी उस्माना़बाद येथे  झालेल्या बैठकीत तिर्थ क्षेत्र तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभिकरण करणे कामाच्या सुधारित अंदाजपत्रकास सुधारित प्रशासकीय मान्यता देणे बाबत तत्वतः मान्यता देण्यात आली. तसेच याबाबत शासनाकडे पाठपुरावा करून तात्काळ मान्यता घेऊन येणे बाबत निर्णय घेण्यात आला. तुळजापूर विकास प्राधिकरण ची बैठक मंगळवार रोजी प्राधकरण अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

यात आ.राणाजगजितसिंहजी पाटील  यांनी याबाबत नगरविकास विभागाचे सचिव श्री. महेश पाठक यांच्याशी चर्चा केली असून विषयाची संवेदनशीलता लक्षात घेऊन तातडीने मंजुरी देण्याची विनंती केली. प्रस्ताव हातोहात पाठवा मी तातडीने मंजुरीसाठी घेतो, असे त्यांनी आश्वस्त केले आहे. असे या बैठकीत सांगितले .

 बैठकीमध्ये तुळजापूर शहरातील मुख्य पाच रस्त्याच्या ठिकाणी जे कि भवानी मंदिर ते शिवाजी चौक, भवानी मंदिर ते शुक्रवार पेठ, बाबासाहेब आंबेडकर चौक ते एसटी स्टँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कमान वेस रस्ता, तसेच छत्रपती शिवाजी महाद्वार ते दर्शन मंडप रस्त्याच्या ठिकाणी पथदिवे बसणे बाबत त्यांनी मंजुरी देण्यात आली.  तसेच तुळजापूर विकास प्राधिकरणांतर्गत नियोजीत रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली यामध्ये हुतात्मा स्मारक ते पावणार गणपती रस्ता व कमान वेस ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक उर्वरित रस्ता भूसंपादन करणे याबाबत लवकरच कारवाई करणे बाबत माननीय नगराध्यक्ष यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी तत्काळ लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले. 

तसेच तुळजापूर शहरातील सर्वीस रोड (उस्मानाबाद रोड, नळदुर्ग रोड) वरील  सर्व रस्त्याच्या ठिकाणची विद्युत पोल स्विफ्ट करणे बाबत माननीय अधीक्षक अभियंता यांना यापूर्वीच मान्यता देऊनही सदरचे काम पूर्ण न झाल्यामुळे सदरच्या ठिकाणी रस्त्याचे काम करण्यास विलंब होत आहे याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधीक्षक अभियंता विद्युत यांना सदरच्या कामास निधी उपलब्ध असुनही सदरील कामास  सुरुवात केली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली तसेच सदरची काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अन्यथा कारवाई करण्याची निर्देश दिले.  

 शहरातील भुयारी गटार योजना योजनेच्या झोन क्रमांक एक ते पाच या ठिकाणी करण्यात आलेल्या कामाची तपासणी करून घेण्यात यावी व सदरील योजना पूर्ण करणे बाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी याबाबत माननीय आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी तसेच माननीय नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी सूचना दिल्या. त्यानुसार सदर योजनेची तांत्रिक तपासणी करून घेऊन सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करणेबाबत माननीय जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष तुळजापूर विकास प्राधिकरण यांनी कार्यकारी अभियंता मजीप्रा यांना सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत उस्मानाबाद रोड ते तुळजापूर खुर्द रस्त्याचे काम करण्यात आले असून सदरच्या रस्त्याची डिझाईन अत्यंत धोकादायक पद्धतीने करण्यात आली असून त्यामुळे सदर ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे माननीय राणाजगजितसिंह पाटील आमदार यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर माननीय जिल्हाधिकारी यांनी मी स्वतः आज  दिनांक 6- 1 -2021 रोजी प्रत्यक्ष सदरच्या रस्त्याची पाहणी केली. तसेच सदर सर्किट हाऊस एस टी काॅलनी  रोड हा व्हीआयपी रस्ता असून सदरच्या रस्त्याच्या ठिकाणी दोन्ही बाजूस फुटपाथ व नालीचे काम करणे बाबत माननीय नगराध्यक्ष यांनी सुचवले त्यानुसार माननीय जिल्हाधिकारी यांनी प्राधिकरणांतर्गत नालीच्या कामाकरता निधी उपलब्ध नसून सदरच्या कामाकरता नगरपरिषदेने डीपीडीसी अंतर्गत रस्ता सादर केल्यास डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. तसेच मा. नगराध्यक्ष यांनी शुक्रवार पेठ रस्त्या कडील *उत्तर बाजुस महाद्वार बाहेरील पायऱ्यांच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पार्किंग होत असल्याने सदरचा रस्ता उपयोगात येत नाही तरी सदर ठिकाणचे पायऱ्या काढून घेण्यात याव्यात याबाबत विनंती केली असता माननीय जिल्हाधिकारी यांनी सदरची कामे प्राधिकरणाअंतर्गत झाली आहे तरी आता त्याठिकाणी नव्याने काम करणे शक्य नसून सदरच्या ही कामाचा प्रस्ताव नगर परिषदेमार्फत डीपीडीसी मध्ये सादर करावा व त्या ठिकाणी उपलब्ध निधी म्हणून काम करून घेण्यात यावे असे सूचित केले.

 नगराध्यक्ष यांनी यापूर्वी प्राधिकरणांतर्गत सर्व यंत्रणांना देण्यात आलेल्या प्रशासकीय मान्यता व खर्च झालेला निधी व त्यामधील बचत किती आहे याबाबत सूचित करावे जेणे करून उर्वरित निधीतून व बचती मधुन पुढील नवीन कामाचे नियोजन करणे सुलभ होईल याबाबत विनंती केली असता   जिल्हाधिकारी यांनी सर्व यंत्रणांना आपणास देण्यात आलेल्या निधीची बचतीबाबत लेखी माहिती सादर करणेबाबत कळविले. तसेच सावरकर चौक (गोलोई)रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक या ठिकाण तसेच गोलाई ते नळदुर्ग रोड फिल्टर टाकी रोड या रस्त्याचे ठिकाणी पथदिव्यांची नसल्याने सदरचा रस्ता पूर्णपणे अंधारात असून हा मुख्य रस्ता आहे तरी सदर च्या ठिकाणी पथदिव्यांची काम करणे बाबत माननीय नगराध्यक्ष यांनी विनंती केले जिल्हाधिकाऱ्यांनी सदर कामास अंतर्गत निधी उपलब्ध करून देतो असे असे आश्वासित केले. तसेच नगराध्यक्ष यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला कि आज पर्यंत विकास प्राधिकरणाने तुळजापूर शहरा मध्ये रस्ता रुंदीकणा मध्ये ज्या काही जागा भुसंपादन झालेल्या आहेत त्याचा वाढीव मावेजा हि नगर परिषद तुळजापूर देऊ शकणार नाही तर हा मावेजा प्राधिकरण अथवा शासनाने द्यावा जेणे करुण शहर वासियांना सदर जागेचा मावेजा लवकरात लवकर मिळेल असे सुचवले त्या अनुशंगाने मा.जिल्हाधिकारी मोहदयांनी आपण भुसंपादनाचा तसा  प्रस्ताव इकडील कार्यालयात  पाठवावा असे सुचवले.


 
Top