तुळजापूर / प्रतिनिधी-

 तुळजापूर येथे पत्रकारांसाठी पञकार भवन बांधुन देण्यासाठी आपण प्रयत्नशिल राहु ,असे प्रतिपादन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांनी  केले.

पञकार दिनानिमित्ताने राजे संभाजी महाराज पुतळ्या समोर आयोजित सन्मान सोहळ्यात  ते बोलत होते. प्रथमता राजे संभाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पञकारांच्या हस्ते पुष्पहार घालुन अभिवादन केल्यानंतर श्री तुळजाभवानी, राजमाता जिजाऊ महाध्दारी जावुन पञकारांच्या उत्तम आरोग्यासाठी महाआरती करण्यात आली.

यावेळी नगराध्यक्ष सचिन रोचकरी,  नगरसेवक विजय कंदले,अभिजीत कदम, औदुबंर कदम, आनंद कंदले, कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक, कर्मचारी व  सर्व पञकार नगरसेवक आदी उपस्थित होते.

 
Top