उस्मानाबाद/ प्रतिनिधी
तुळजापूर पोलिस ठाण्यात तीन वर्षापूर्वी दाखल लैंगिक छळाच्या आरोपातील फरार असलेला आरोपी अखेर तुळजापूर पोलिसांनी बुधवारी गजाआड केला. तुळजापूर ठाण्यात क्राईम रजिस्टरमध्ये २५९/ २०१८ ने दाखल गुन्ह्यातील आरोपी सागर अशोक शिंगे (रा. तुळजापूर) याचा पोलिस गेली ३ वर्षे शोध घेत होते.